Tips To Dry Clothes in Rainy Season: पावसाळ्यात कधी कधी ओले कपडे 2 दिवस सुकत नाहीत. इथेच ही समस्या निर्माण होते. गॅलरीत किंवा घरात कपडे सुकवले जात असतील तर कपड्यांचा वास संपूर्ण घरात येत राहतो. अनेक वेळा तेच कपडे काही दिवस घालावे लागतात आणि अशा स्थितीत आम्ही तुम्हाला ओले कपडे लवकर सुकवण्याच्या 5 सोप्या युक्त्या सांगत आहोत.
२. प्रेसने कपडे सुकवा: ओले कपडे तुम्ही प्रेसने म्हणजे इस्त्रीने सहज सुकवू शकता. कपडे प्रेसकरताना कपड्यांचे पाणी बाष्पीभवन होऊन काही प्रमाणात हे कपडे सुकतात. मात्र, प्रेसकरताना कपडे जास्त गरम करू नका, अन्यथा कपडे जळू शकतात.
3. ओव्हनने कपडे सुकवा: लहान कपडे सुकवण्यासाठी तुम्ही तुमचा मायक्रोवेव्ह ओव्हन वापरू शकता. जसे अंडरवेअर, रुमाल, बनियान मोजे इ. तथापि, या दरम्यान काळजी घ्या. कपडे जळण्याचाही धोका आहे. त्यावर फक्त वाफ येईपर्यंत कपडे वाळवावेत.