प्रेमाचा रस्ता मैत्रीतून जातो

काही मुले मुलींना पटविण्याबाबत अगदीच 'ढ' असतात. त्यांना काहीही कळत नाही. बावळटच म्हणा ना. कधी कधी तर आपला बावळटपणा हेच मुलींना पटविण्याचे 'हत्यार' आहे, असे त्यांना बिनडोक बॉलीवूडी चित्रपट पाहून वाटत असते, काही जण त्या बावळपटपणावर 'स्मार्टनेस' पांघरून मुलींना पटविण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, मुली फार हुषार असतात (निदान या बाबतीत तरी) त्यांना तुम्ही त्यांना इम्प्रेस करण्यासाठी जे काही करता ते कळून येते. म्हणूनच त्यांना पटविण्यासाठी काही फंडे देतोय त्याचा अवलंब करा. यश नक्कीच तुमच्या 'मिठीत' येईल.
 
मुलगी तुमच्या वर्गात, क्लासमध्ये असेल तर...
त्या मुलीची पूर्ण माहिती काढा. लक्षात घ्या. यात जवळचा मित्रही तुम्हाला दगा देऊ शकतो. म्हणून तिच्या एखाद्या मैत्रिणीशी ओळख काढा. मुलीला पटविण्याचा मार्ग तिच्या मैत्रिणीला आधी पटविण्यातूनच जातो, हे लक्षात घ्या. मैत्रिणीची आवड निवड लक्षात घेऊन तिला खुष ठेवण्याचा प्रयत्न करा. मग हळू हळू तिच्याकडे मैत्रिणीविषयी चौकशी करा. पहिल्यांदाच फार चौकशी करू नका. मुळात चौकशी करताना तिच्याविषयी थोडा तक्रारीचाच सूर ठेवा. म्हणजे तुम्हाला तिच्यात काही रस नाही, असे या मैत्रिणीला वाटेल. पण त्याचवेळी तुम्ही तिच्या मैत्रिणीविषयी जे बोलता ते खोडून काढण्याचा तिचा प्रयत्न राहिल. कारण शेवटी ती तिची मैत्रिण आहे.
 
या मैत्रिणीला एखादी 'क्वेरी' विचारण्याच्या किंवा आणखी कशाच्या बहाण्याने भेटत जा. मग ती तुम्हाला तिच्या मैत्रिणीशी ओळख करून देईल. तत्पूर्वी तुम्ही आपल्या प्रेयसीची आवड-निवड मैत्रिणीमार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्या दोघी जेव्हा भेटत असतील तेव्हा तुमच्या प्रेयसीला जे आवडते तेच तुम्हाला आवडते हे दाखवून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमची आवड तुमच्या प्रेयसीच्या मनावर ठसत जाईल. तिच्या आवडत्या रंगाचे कपडे, पदार्थ, पुस्तकं या विषयाच्या माध्यमातून तिला खुष केला. तिला बोलायला कोणता विषय आवडतो तेही शोधून काढा नि नेमका तोच तिच्या उपस्थितीत काढण्याचा प्रयत्न करा. त्या विषयावर ती बोलू लागली की प्रेयसीचे जे मत आहे, त्याच्या विरोधात शक्य तो जाऊ नका. पण त्या मतात आपल्याला काही भर घालता येते का ते करा. त्यामुळे काय होईल, की तुमची बुद्धिमत्ता तिच्या मनावर ठसेल. तुमचा वेगळेपणा तिला दिसून येईल.
 
मग ही मैत्री अशीच वाढू द्या. लक्षात घ्या. प्रेमाचा रस्ता मैत्रीतून जातो. त्यामुळे लगेचच तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नका. ही मैत्री चांगली फळू-फुलू द्या. ती पिकली की मग आपोआपच प्रेमाचा सुगंध त्यातून बाहेर यायला लागतोच. तत्पूर्वी मैत्रीतूनच छोट्या पिकनिक, सहली काढा. कधी कधी बाईकवरून कुठे जायचे असेल तर जा. त्यात तुम्ही तिची किती काळजी करता ते दाखवायला विसरू नका. तिच्या भेटीसाठीची धडपड, अधीरता तिच्यापासून लपवू नका. तुमच्या मनात काही चाललंय. त्याचवेळी तिच्या मनातही चाललेलं असतं. ते तिला जाणवेल.
 
मग एक छानसा दिवसा निवडा नि तिला चक्क प्रपोझ करा. प्रपोझ करण्यासाठी जागा चांगली निवडा. छानसं हॉटेल (जिथे एकांत असेल), नदी किनारा, समुद्र किनारा, छानसं, निवांत स्थळही चालेल. अतिशय सज्जनपणे तिला गुलाबाचं फूल देऊन प्रेम व्यक्त करा.
 
(डिसक्लेमर- इतक्या सगळ्या प्रयत्नानंतर तुमची प्रेयसी तुम्हाला होकार देईल याची कोणतीही जबाबदारी वेबदुनियाची नाही)

वेबदुनिया वर वाचा