श्रावणात बहरली प्रीत...

मंगळवार, 29 जुलै 2014 (13:16 IST)
ते श्रावणातले दिवस होते, खरच शालेय जिवनातील वातावरण कसे भारलेले असते, मीनाक्षी आणि अमित हे एकाच वर्गात होते. पाहिली ते दहावीपर्यतचा एकामेकांचा सहवास आयुष्याभर आठवणीत राहणाराच होता. मात्र ज्यावेळी महाविद्यालयीन शिक्षणासाठी अमित शहरात आला होता. अमितचे वडिल तसे शेत
 
करी, आई गृहिणी आणि दोन बहिणी असा कुटुंबाचा विस्तार होता. अमितवर आई-वडिलांची खुप अपेक्षा होती. अमितही तसा समदार होता. सुट्टीचा दिवशी तो वडिलांसाठी शेतात काम करत होता. कष्टाची, परिस्थितीची जाणिव अमितला होती. आपल्या वाट्याला आलेले कष्ट आपल्या पोराच्या वाट्याला येवू नये यासाठी आई-वडिल रात्रंदिन राबराब राबायचे.... हे सर्व अमित अगदी लहानपणापासून पाहत होता. अमित आणि मिनाक्षी हे एकाच गल्लीत राहत होते. जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षण घेत होते.

पाहिली ते दहाविपर्यंत एकमेकांशेचारीच बसत होते. मात्र मीनाक्षीच्या मनात अमितविषयी आदर आणि प्रेम होते. मीनाक्षीने ते अमितच्या लक्षात येईल असे कधीच वागले नाही, श्रावणनातला तो महिना होता. क्षणात पाउस आणि क्षणात उन असा लपंडाव असायचा...तो काळ पावसाळ्याच्या होता. निसर्गही फुलत होता. याच श्रावणात मीनाक्षी आणि अमितचे प्रेम बहरले... ऐन दुपारची वेळ होती. शाळा सुटल्यानंतर अमित आणि मीनाक्षीची धडपड सुरु होती. अडोशाच्या शोधात त्यांनी एका घराच्या भिंतीचा आश्रय घेतला. आडोस शोधत असतानाच हे दोघेही चिंब..चिंब झाले होते. तशी मीनाक्षीला थंडीही वाजत होती. दोघांचेही अंगावरचे कपडे पार पावसाने भिजून गेले होते. ढगांचा गडगडाट आणि आकाशात विजांचा कडकडाट सुरु होता. अचानक जोरदार मेघगर्जनेसह आकाशात विज चमकली...आणि क्षणात मीनाक्षीने अमितला मिठी मारली...याच क्षणी अमितच्या अंगात वीज संचारल्यागत झाले. प्रेमाने मारलेल्या या मीठीमुळे अमितचे ह्रदय धडधडयला लागले. अमितला कांहीच सुचेना..

जोराचा पाउस सुरू होता. मीनाक्षीने तर अमितला करकरुन धरले होते. इकडे मीनाक्षीच्या मनात याच श्रावणातल्या पावसाच्या साक्षीने प्रीत बहरली होती. अमितिचा सहवास हा पहिल्यांदाच तीला लाभला होता. आज श्रावणतल्या पावसासंगे अमित-मिनाक्षी हे दोघेच होते. श्रावणातल्या या पावसाने आज त्यांच्या प्रेमाला एकप्रकारे बळ दिले होते. पाउस थोड्या वेळाने ओसला... रस्त्यावरची रहदारी पुन्हा सुरु झाली. मीनाक्षीला हा पाउस थांबूच नये...असेच वाटत होते. ते दोघेही घरी निघाले. मीनाक्षी-अमितच्या मनात आज प्रेमांकूर फुलला होता. सायंकाळ झाली होती. मीनाक्षीच्या मनात मात्र प्रेमाच्या या क्षणाने खळबळ माजली होती. अमितचा हा सहवास तीला आयुष्यभरासाठी हवा होता. मात्र मीनाक्षीच्या या प्रेमाला तीचे आईवडिल मान्यता देतील का? हा प्रश्न तीला रात्रभर सतावत होता. तीची रात्र... तो क्षण आणि अमितच्या आठवणीतच गेली...या आठवणींच्या काहुरात तीला कधी झोप लागली हेही समजले नाही.

पहाट झाली... मीनाक्षीच्या आईने तीला हाक मारली... उठ सकाळ झाली...शाळेला जायचं नाही का? मीनाक्षीची रात्र अमितच्या आठवणीतच गेली होती...सकाळी उठवल्यानंतर मीनाक्षीने हाती खराटा घेत अमितचा चेहरा दिसावा यासाठी अंगण झाडण्याचा आज बहाणा केला होता. अमित अंगणातल्या गायीला चारा टाकत होता. तर त्याचे वडिल गायीचे दूध काढत होते. अमित-मीनाक्षीची नजर एक झाली आणी मीनाक्षीच्या चेहर्‍यावर स्मीत हास्य फुलले...आज अमित महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात गेला आहे. इकडे गावतल्याच महाविद्यालयात मीनाक्षी शिक्षण घेत आहे. आज मिनाक्षी दर आठड्याच्या सुट्टीची अगदी अतुरतेने वाट पाहते...कारण शहरात शिक्षणासाठी गेलेला तिचा अमित न चुकता गावी यायचा...त्याचा चेहरा पाहण्यासाठी मीनाक्षी कावरीबावरी होत असे...

- राजकुमार जोंधळे
 

वेबदुनिया वर वाचा