आभाळात आले, काळे काळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात गं ।। 1 ।।
रुसलास उगा का जवळी येना जरा
गा गीत बुलबुला माझ्या प्रितपाखरा हा राग खरा की नखऱ्याचा मोहरा
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
रंग माझा तुला, गंध माझा तुला,
बोल काही तरी, बोल माझ्या फुला
नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका... तुटका होतो
जगण्याचे विरती धागे,
संसार फाटका होतो.
जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली
अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती