रंग माझा तुला, गंध माझा तुला, बोल काही तरी, बोल माझ्या फुला सांग लाजूनही नाव आता तरी एक खोळंबले गीत माझ्या उरी अन वसंतास शब्द मी माझा दिला वेळ जादू भरी ही गुलाबी हवा ही न मेंदी तुझी रंग माझा नवा भास झाला खरा, श्वास झाला खुला हाय माझी-तुझी भेट झाली अशी शीळ यावी पुढे चांदण्यांची जशी सांग सोडू कसा हात हातातला बोल काही तरी बोल माझ्या फुला