Home Tips : जळालेले दूध टाकून देण्याऐवजी अशा प्रकारे पुन्हा वापरा

शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (07:50 IST)
अनेक वेळेस गॅस वर दूध ठेवल्यानंतर काही कारणाने ते जळून जाते. जळालेले दूध पातेल्याच्या तळाशी चिटकून जाते, व वास येतो. तसेच जळालेले दूध आपण परत वापरत नाही अनेक वेळेस आपण हे जळालेले दूध फेकून देतो. पण आवाज आपण अश्या काही टिप्स पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्ही दुधाला येणार जळालेला वास दूर करू शकाल.
 
दालचीनी- 
जळालेला दुधाचा वास निघून जाण्याकरिता तुम्ही त्यामध्ये दालचिनीचा उपयोग करू शकतात. दालचीनी गरम दुधामध्ये मिक्स करावी. यामुळे दुधामध्ये गोडवा येईल आणि दुधाचा वास निघून जाईल. 
 
चॉकलेट पाउडर, गूळ, हळद-   
दुधामध्ये चॉकलेट पाउडर, गूळ, हळद किंवा केशर सारख्या अनेक वस्तू मिक्स करू शकतात. यामुळे दुधाला लागलेला वास दूर होईल. 
 
वेलची- 
दूध जर जळालेले असेल तर त्यामध्ये दोन ते तीन वेलची घालाल. यामुळे दुधाला लागलेला वास दूर होईल.
 
बदलवून द्यावे दुधाचे पातेले-
जर दूध जाळले असेल तर दुधाचे पातेले बदलून द्या. तसेच दूध जर जाळले आहे असे वाटत असेल तर लागलीच दुसऱ्या पातेलीत काढून घ्या ज्यामुळे दुधाला वास लागणार नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती