एकदा एका शहरात हरिदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता.त्याच्या कडे शेत तर होते पण त्याच्या मध्ये पीक कमी होते. एकदिवस हरिदत्त शेतात झाडा खाली झोपला होता.त्याचे डोळे उघडले तर तो काय बघतो की एक साप फण काढून बसला आहे. ब्राह्मणाला जाणवले की हा साप सामान्य नसून कोणी तरी देवरूप आहे. ब्राह्माणाने विचार केला की आज पासून मी ह्याला दररोज दूध देईन.
हरिदत्त च्या मुलाने विचार केला की या सापाच्या बिळात एखादा खजिना असावा. त्याने सापाचं बीळ खणण्याची योजना आखली परंतु त्याला सापाची भीती देखील वाटत होती. त्याने विचार केला की जेव्हा तो साप दूध पिण्यासाठी बाहेर येईल मी त्याच्या डोक्यावर काठीने जोरात मारेन जेणे करून तो साप जागीच थर होईल आणि मी त्याच्या बिळातून खजिना घेईन.आणि जगातील सर्वात श्रीमंत माणूस होईन.
दुसऱ्या दिवशी आखलेल्या योजनेनुसार, त्याने त्याला दूध प्यायला दिले आणि काठीने जोरदार मार दिला पण तो साप मेला नाही तर रागावला आणि त्या मुलाला दंश केला. सापाने दंश केल्यावर तो मुलगा लगेच जागच्या जागी मेला. हरिदत्त ला परत आल्यावर हे सर्व समजतातच त्याला वाईट वाटले आणि त्याने सापाची क्षमा मागितली.