फुलपाखरांचा गाव

WDWD
गावात फुलपाखरांच्या
शाळा अभिनव भरते
गंधांची उधळण आणि
रंगांचे रांजण सरते .....

घंटेची नाही घणघण
नाही शासन नाही छडी
अशी चित्र काढत राहू
फुले, फळे आणिक झाडी ....

पशू, पाखरे, नदी, नाले
गावामध्ये अशीच वस्ती
या या तुम्ही अमुच्या गावी
चला करूया थोडी मस्ती ..........

- देवीदास

वेबदुनिया वर वाचा