परीक्षा

NDND
आज म्हणे परिक्षा
लवकर आली रिक्षा
आई-बाबा-ताई
सर्वांनी केली घा

'नीट दे ध्यान
उत्तर लिही छान
नको मारू उड्या
नको काढू खोड्या
तरच होशील पास
नाहीतर नापास
मग संपेल शाळा
ना खडू ना फळा'
छे बुवा..... मला काऽऽऽऽऽऽऽऽऽ ही कळत नाही

NDND
पास म्हणजे काय?
नापास म्हणजे काय?
'मग संपेल शाळा',
म्हंजे कायमची संपली की काय?'