कोमट पाणी पिण्याचे फायदे-
आयुर्वेदच नव्हे तर अनेक संस्कृतींचा विश्वास आहे की गरम किंवा कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम आहे. थंड पाणी रक्तवाहिन्या प्रतिबंधित करतं आणि अशात आपलं शरीर अन्नामधून सर्व पोषक आणि जीवनसत्त्वे आत्मसात करण्यास सक्षम नसतं. कोमट पाणी पचन प्रक्रियेला गती देतं आणि हे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी देखील योग्य आहे. गार पाण्यामुळे फॅट्स गळत नाही आणि हळू-हळू लठ्ठपणा वाढत राहतो.