फळांच्या रसाचे हे घरगुती उपचार खरंच आपणांस माहीत नसणार..

गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (16:18 IST)
फळांचे रस आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे, पण हे आपणांस क्वचितच माहिती असेल की वेगवेगळ्या फळांच्या रसाचे सेवन करून बऱ्याच आजारांचे उपचार घरी करता येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या -
 
1 वजन वाढविण्यासाठी : वजन वाढविण्यासाठी दुग्ध कल्प खूप फायदेशीर असत. सुके मेवे (ड्रायफ्रूट्स), गव्हाचा रस आणि इतर सर्व प्रकारांच्या फळांच्या रसाचे सेवन केल्याने वजन देखील वाढू शकतं. फळांच्या रसाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळू शकते.
 
2 आम्लपित्त (ऍसिडिटी) साठी : आम्लपित्ताचा त्रास होत असल्यास त्यापासून सुटकेसाठी गाजर-कोबी, भोपळा, खडीसाखर आणि सफरचंद-अननसाचा रस एक चांगला पर्याय आहे. आपल्याला हवे असल्यास एक ग्लासा पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि अर्धा चमचा खडीसाखर मिसळून दुपारच्या जेवणाच्या अर्धा तासापूर्वी घ्यावं असे केल्यास आम्लपित्त किंवा ऍसिडिटी पासून सुटका मिळण्यात मदत होईल.
 
3 गॅस साठी : आवळ्याचे चूर्ण सकाळ आणि संध्याकाळी घ्यावे, दोन वेळेच्या जेवणात योग्य अंतर राखा. तणावमुक्त राहा, प्राणायाम आणि ध्यान करा. असे केल्यास गॅस आणि ऍसिडिटीमध्ये फायदा होतो.
 
4 सर्दी : कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून गुळाने करावे. घोट-घोटभर हे पाणी देखील पिऊ शकता. तुळशीचे पान, पुदिन्याचे पान, अर्धामोठा चमचा आलं आणि गूळ दोन कप पाण्यात उकळवून घ्या. गाळून त्यात एक लिंबाचा रस घालून त्या पाण्याचे सेवन करा.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती