Rakshabandhan health Tips : सणासुदीच्या काळात वाढत्या वजनाला नियंत्रित करण्यासाठीच्या या 10 टिपा जाणून घेऊ या....

गुरूवार, 30 जुलै 2020 (11:49 IST)
सणासुदीला मिठाई आणि पक्वान्न भरपूर बनतात. याच्यासह या गोष्टीची खात्री होते की आपण अतिरिक्त कॅलरीसह आपले वजन वाढवून घेतो. मग आता आपण कसला विचार करीत आहात, वजनाला संतुलित करण्यासाठी जाणून घेऊ या हे 10 उपाय, जेणे करून आपण आपल्या वाढत्या वजनाला नियंत्रित करू शकता ...
सणासुदीच्या काळात खाण्या पिण्यात काहीही कमतरता करू नये, पण आपल्याला इतर दिवसात योग्य तो आहार घेतला पाहिजे जेणे करून आपल्या शरीरात आणि वाढत्या वजनाला संतुलित करू शकाल. जाणून घेऊ या कसं करावं आपल्या वजनाला नियंत्रित-
1 सामान्य दिवसात आपण आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या, विशेषतः की आपण जे काही खात आहात त्यामध्ये जास्त कॅलरी असायला नको. आहारात अश्या वस्तूंचा समावेश करावा ज्यामध्ये चरबी आणि कॅलरी जास्त प्रमाणात नसेल आणि ऊर्जा देखील मिळत राहावी.
2 फळ आणि कच्च्या भाज्यांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करावा. ज्यूस, सूप, सॅलड किंवा कोशिंबीर देखील चांगले पर्याय आहे. या सर्व गोष्टी आपणास ऊर्जा देतील आणि शरीरातून हानिकारक घटक बाहेर काढून पचन प्रणाली सुधारतात.
3 अन्न शिजवताना तेल-तुपाचा वापर करणं टाळावं. हे आपल्यासाठी शक्य नसल्यास, तर तेल, तूप मसाले कमीत कमी वापरा.
4 दिवसभरात कमीत कमी 3 लीटर पाणी आवर्जून प्या. काही काही वेळाने पाणी पीत राहावं. आपण लिंबू पाणी देखील पिऊ शकता, हे चव आणि आरोग्य दोन्हीसाठी फायदेशीर आहे.
5 ज्या वस्तूंमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असतात त्या वस्तूंना आपल्या पासून लांब ठेवावं आणि खाद्य पदार्थांमधील चरबीच्या प्रमाणावर विशेष लक्ष द्या.
6 सकाळची न्याहारी चांगली करा पण रात्रीचे जेवण हलकेच करावं. रात्रीचे जेवण दरवेळेपेक्षा लवकर करावं  आणि जेवण्यात आणि झोपण्याच्या वेळेत अंतर राखावं.
7 अँटीऑक्सीडेन्ट घटकांसाठी दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन-टी प्या. ह्याचे सेवन केल्याने आपल्याला हलकं आणि ऊर्जावान देखील वाटेल.  
8 दिवसभर एकाच जागी बसून राहण्यापेक्षा वेळोवेळी चालतं फिरतं राहावं. सकाळी किंवा रात्रीचे चालणं आपल्यासाठी फायदेशीर राहील. आपली इच्छा असल्यास आपण घराच्या गच्चीवर देखील शतपावले करू शकता.
9 व्यायाम आवर्जून करावं. नियमाने व्यायाम केल्याने आपण आपले वजन नियंत्रित करू शकता. जास्त काही करावयाची इच्छा नसल्यास आपण घरातच दोरीच्या उड्या किंवा लहान मुलांसह खेळ खेळणं देखील एक चांगला पर्याय आहे.
10 जेवण केल्यावर गरम किंवा कोमट पाणी प्यावं. हे पचन सुधारेल आणि चरबीयुक्त आहार घेतल्याने पोटावरील चरबी वाढण्यापासून प्रतिबंधित करेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती