काटा रुतला? मग काटा काढण्यासाठी हे उपाय करावे

गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (10:49 IST)
काटा असतो तर अगदीच लहान, पण तो रुतल्यावर खूप वेदना होतात. ज्या जागी काटा रुततो त्या ठिकाणी काटा निघेपर्यंत टोचत राहतं. बागकाम करताना किंवा इतर काम करताना हातात किंवा पायात काटा रुततो. म्हणून बागकाम करताना किंवा अनवाणी चालत असताना काळजी घ्यावी. बऱ्याच वेळ काटा न निघाल्याने संसर्ग होऊ शकतो. रुतलेला काटा काढण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता
 
* काटा रुतल्यावर त्या जागेला न चोळता चांगल्या प्रकारे साबणाने स्वच्छ करावं. कपड्याने पुसल्यावर काटा दिसत असल्यास हळुवार काटा ट्विंजरने काढावा. बरेच लोक काटा काढण्यासाठी सुई किंवा पिनचा वापर करतात असे करू नये, असे केल्यास संसर्ग होऊ शकतो. म्हणून सुई किंवा पिन आधी अँटिसेप्टिकने स्वच्छ करावं. ट्विंजरला प्रथम स्वच्छ करावं.
 
* जर आपल्या हातात काटा रुतला असेल आणि तो दिसत नसल्यास बेकिंग सोड्यात थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवून घ्या या पेस्टला काटा लागल्याच्या जागी लावून पट्टी बांधून घ्या. या पट्टीला एक दिवसासाठी असेच बांधून ठेवावं. पट्टी उघडल्यावर आपल्याला काटा दिसू लागेल. जो आपण सहजपणे बाहेर काढू शकता. 
 
* सैंधव मिठाने देखील काटा सहज काढता येऊ शकतो. काटा दिसत नसल्यास सैंधव मिठाला पाण्यात मिसळून त्या पाण्याने जागेला धुऊन घ्या जिथे काटा रुतला आहे. असे केल्याने काटा दिसू लागतो. ट्विंजरने काट्याला बाहेर काढावं. आपल्याला वेदना होत असल्यास सैंधव मिठाची पट्टी लावावी काटा आपोआप बाहेर निघेल.
 
* काटा काढण्यासाठी केळ्याची साले हळुवार हाताने काटा रुतलेल्या जागी चोळावे. नंतर केळ्याची सालं ठेवून पट्टी बांधावी. असे केल्याने काटा बाहेर निघून येईल. जर का आपणास जास्त त्रास होत असल्यास काटा निघत नसल्यास डॉक्टरला दाखवावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती