कोलेस्ट्रॉल एक प्रकारचा फॅटी पदार्थ आहे, जे लिव्हरद्वारे तयार होतो, हे प्रथिनेसह लिपोप्रोटीनचे निर्माण करते.जे फॅट ला रक्तात मिसळू देत नाही.शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात- एचडीएल(हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन,चांगले कोलेस्ट्रॉल) आणि एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन बॅड कोलेस्ट्रॉल)चांगले कोलेस्ट्रॉल हे खूप हलके असतात आणि रक्त वाहिन्यांमधील साठलेली चरबी काढून टाकतो.खराब म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल एलडीएल अधिक चिकट आणि जाड आहे .जास्त असल्यावर रक्तवाहिन्या आणि धमनीच्या भिंतीवर जमा होते. ज्यामुळे रक्ताचा प्रवाह प्रतिबंधित होतो. हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा या सारख्या समस्या उद्भवू शकतात. काही गोष्टींना समाविष्ट करून वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या.
5 लिंबू-
लिंबासह सर्व आंबट फळांमध्ये विरघळणारे फायबर आढळतात जे बॅड कोलेस्ट्रॉलला रक्तात जाण्यापासून रोखतात. या मधील व्हिटॅमिन सी रक्तवाहिन्यांची स्वच्छता करून बॅड कोलेस्ट्रॉल पचन तंत्राच्या द्वारे शरीरातून बाहेर निघून जातात. आंबट फळांमध्ये असे एन्जाईम्स आढळतात जे मेटॅबॉलिझम प्रक्रिया वाढवून कोलेस्ट्रॉल कमी करतात.