आहार बदल सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. म्हणून आता मसालेदार, स्पाईसी, तळकट खाणे टाळा. लिक्विड डाइट अधिक घ्या. घरातून बाहेर पडण्यापूर्वी लिंबू पाणी, ताक, किंवा फ्रूट ज्यूसचे सेवन करणे विसरू नका.
उन्हाळ्यातील फळं कलिंगड, काकडी, खरबूज, द्राक्ष, संत्री, स्ट्रॉबेरी, नारळ पाणी, आंबा आपल्या आहारात सामील करा.
उन्हाळ्यात रॉक साल्ट, जिरं, बडीशेफ आणि वेलची सारखे मसाले वापरून दही, कैरीचं पना, पुदिना, थंडाई, सातू हे सेवन करणे शरीरासाठी अनुकूल ठरेल.