Capsicum Side Effects जेवणाची चव वाढवणारी शिमला मिरची आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. ही मिरची तीन रंगांत येते. यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, व्हिटॅमिन के, कॅरोटीनोइड्स आणि कार्बोहायड्रेट्स यांसारखे पोषक घटक असतात. पण त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. सिमला मिरची जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होते हे आज आम्ही तुम्हाला सांगतो.
रक्ताशी संबंधित आजारांचा धोका वाढेल
जर तुम्ही रक्ताशी संबंधित कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर सिमला मिरचीचे सेवन करू नका. सिमला मिरची तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या रक्ताशी संबंधित आजार होऊ लागतात ज्यामुळे समस्या वाढू शकते.
शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर
शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर सिमला मिरचीचे सेवन करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. सिमला मिरची खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्त प्रवाह वाढू शकतो, ज्यामुळे तुम्हाला रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो.