आंब्याची साले फेकून देऊ नका,याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या
बुधवार, 30 जून 2021 (21:41 IST)
आंब्याचे फायदे बरेच आहेत, परंतु आंब्याच्या सालाला कमी महत्त्व नाही.आंब्याच्या सालींमध्ये आरोग्याचे रहस्य दडलेले आहे.खाण्यापासून त्वचेची निगा राखण्यापर्यंत आपण याचे फायदे घेऊ शकता.बरेच लोक याची साले फेकून देतात.परंतु याच्या सालीचे फायदे जाणून घेतल्यावर आपण साली फेकून देणार नाही.चला तर मग आंब्याच्या सालींपासून मिळणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊ या.
1 अँटी ऑक्सिडंट-आंब्याच्या सालामध्ये आंब्यापेक्षा जास्त पोषक घटक असतात. त्यामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानाला कमी करण्यात मदत करतात.कारण हे फ्री रॅडिकल्स शरीरातील अवयवांना प्रभावित करण्यासह डोळे, हृदय आणि त्वचेला नुकसान पोहोचवतात.
2 सुरकुत्यांपासून आराम मिळत -आंब्याच्या सालींना वाळवून बारीक करून वाटून घ्या.नंतर त्यात गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होतात. आणि हळू-हळू नाहीश्या होतात.
3 पुळ्यापासून मुक्ती-जर आपल्या चेहऱ्यावर पुळ्या आणि पुटकुळ्याचे डाग असतील तर आंब्याच्या सालीची पेस्ट लावून चेहऱ्यावर लावा.थोड्याच दिवसात डाग नाहीसे होतात.
4 टॅनिग काढते-या मध्ये व्हिटॅमिन सी असतात.सालींना आपल्या हातापायावर चोळा 15 -20 मिनिटे ठेवा नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.किमान एक महिना असं केल्याने फरक दिसेल.
5 खताचे काम-आंब्याबरोबरच इतर फळांच्या आणि भाज्यांच्या सालासुद्धा कंपोस्ट बनवण्यासाठी वापरल्या जातात. हे नैसर्गिक शक्ती निर्माण करणारे आहे.आंब्याच्या सालामध्ये व्हिटॅमिन बी 6 ,व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सह कॉपर फोलेट देखील मुबलक प्रमाणात असतात.या मध्ये फायबर असत.हे सैन्द्रिय खताचे काम करतं.
6 कर्करोगासाठी उपयुक्त - बऱ्याचदा आंबे खाल्ल्यावर त्याचे साले फेकून देतो आणि म्हणतो की याने काय फायदा मिळतो.जर साली मऊ आहे तर आवर्जून खावे.सालींमध्ये असलेल्या घटकांनी कर्करोगापासून बचाव होतो.