कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचे 5 फायदे जाणून घ्या
शनिवार, 15 मे 2021 (09:00 IST)
दररोज सकाळी चहा, कॉफी, दूध किंवा ग्रीन टी पिणे आवडते, परंतु गरम लिंबू पाणी प्याल तर या मुळे आणखी बरेच फायदे मिळतील. होय, गरम पाण्यात लिंबू पिळून पिणे खूप फायदेशीर आहे. याचे 5 फायदे जाणून घ्या -
1 सकाळी ताजे तवाने होण्याच्या पूर्वी कोमट पाण्यात लिंबू घालून प्यायल्याने पोट देखील स्वच्छ होते आणि बद्धकोष्ठता नाहीशी होईल.
2 सकाळी फ्रेश झाल्यावर अनोश्यापोटी कोमट पाण्यात लिंबू घालून पिता तर हे आपल्या अतिरिक्त चरबीला कमी करण्याचे काम करते. या मुळे वजन देखील कमी होते.
3 हे आपल्या पचन तंत्राला फायदा देत.या मुळे पचन प्रणाली देखील चांगली होते. या मुळे पोटाच्या तक्रारींना सामोरी जावं लागणार नाही.
4 गरम पाणी आणि लिंबू घेतल्याने हे आतून शरीराची स्वच्छता करत. आणि हानिकारक घटकांना बाहेर काढते. हे प्रतिकारक शक्ती देखील वाढवते.
5 याचा एक फायदा आहे की हे तोंडाच्या वासातून तसेच श्वासाच्या दुर्गंधी पासून मुक्त करते. या मुळे आपल्याला फ्रेश वाटेल .यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आपल्याला अनेक फायदे देईल.