आज आम्ही आपणांस या कर्करोगाचे लक्षण आणि बचाव बद्दल सांगत आहोत.
फुफ्फुसांच्या कर्करोगाची प्रारंभिक लक्षणे -
डोक्यात वेदनेसह चक्कर येणं आणि शारीरिक अशक्तपणा जाणवणं. वजन कमी होणं आणि भूक न लागणं. शरीराच्या विविध भागांना जसे की चेहरा, हात, मान आणि बोटांवर सूज येणं .
जे लोकं सिगारेट ओढतात त्यांना 15 ते 30 पटीने जास्त फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तथापि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये देखील फुफ्फुसांच्या कर्करोगाचा प्रभाव वाढताना दिसून येत आहे. फुफ्फुसाचा कर्करोगाचे लक्षण वेगळे असतात. जिथे हा पसरतो तिथल्या प्रभावित पेशींच्या प्रकारावर अवलंबून असतो. तसेच या वर देखील अवलंबून असतो की गाठ किती मोठी आहे.