आरोग्य विशेष : डोळ्याने देखील दिसून येतात ब्रेन स्ट्रोकचे लक्षण

शनिवार, 16 मे 2020 (16:43 IST)
रक्तामधील ब्लॉकेज दूर करण्यासाठी काही उपाय केले गेले नाही तर ऑप्टिकल नर्व्हला पण हानी होऊ शकते. त्याचबरोबर मेंदूला डोळ्यांपासून मिळणाऱ्या सिग्नलला क्रियान्वित करणाऱ्या भागामध्ये सुद्धा बिघाड होऊ शकतो.
 
मेंदूला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा आणि पोषक तत्त्व व्यवस्थित न मिळाल्याने मेंदूचा विकार होतो. या मुळे ऊतकांना नुकसान होऊ शकतो. अश्या परिस्थितीत रुग्णाला वेळीच औषधोपचार न मिळाल्या मुळे हे दुखणं वाढू शकते. 
 
ब्रेन स्ट्रोकचे लक्षण :
उजव्या डोळ्याची दृष्टी बाधित होत असल्यास असं समजावं की डाव्या बाजूच्या मेंदूला रक्त पुरवठा कमी होत आहे. या आजाराचे बरेच लक्षण आहे जे या गोष्टींवर अवलंबून असतं की रक्त पुरवठा मेंदूतल्या कुठल्या भागात होत आहे. डोळ्यांचे बघण्याचे कार्य मेंदूच्या उजव्या भागापासून नियंत्रित केलं जातं. डोळ्याच्या दृष्टीवर परिणाम होत असल्यास त्याचा अर्थ असा आहे की उजव्या भागाच्या मेंदूला इजा झाली आहे. 
 
पुष्टी कशी करावी : 
नर्व्ह फायबर आणि टिशू(ऊतक) नष्ट झाल्यावर दिसणं कमी होते. रक्त ऑप्टिकल लोव्ह मधून येते त्यामुळे रक्त प्रवाह होत असताना कुठेही रक्त पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे दिसणं एकाएकी कमी होऊ लागतं. 
 
दुहेरी दिसणे: 
डोळ्यांचा नियंत्रण करणार्‍या नर्व्हच्या मधल्या भागेस किंवा डोळ्यांचा भिंगामध्ये बिघड झालास दुहेरी दिसायला लागतं. अश्या परिस्थितीत रुग्ण तर्क संमत बोलत नाही. 
 
नैत्र तज्ज्ञांना दाखविणे: 
अंधुक दिसायला लागल्यावर किंवा अजिबात दिसत नसल्यावर रुग्णाला ताबडतोब चिकित्सकाकडे घेऊन जायला हवं. जेणे करून त्याला तातडीने औषधोपचार मिळू शकेल. त्यामुळे त्याचा दृष्टीला वाचवता येऊ शकेल. किंवा रुग्णाचे प्राण वाचवले जातील. नाही तर उशीर झाल्यामुळे लक्ष प्रमाणाने रुग्ण न्यूरॉन्स गमावू शकतो. स्ट्रोक आल्यावर रुग्णाचे एका मिनिटात 10.9 लक्ष न्यूरॉन्स बिघडतात. ह्याची पूर्ती कधीही पूर्ण होऊ शकत नाही. 
 
उपचार : 
रुग्णाला ह्या आजारात औषधाने आराम मिळतो. त्या मागील कारण असं की आपले शरीर स्वतःच बिघाड झालेल्या रक्त वाहिनीची दुरुस्ती करून घेतं. पण प्रत्येक मिनिटात रुग्णाच्या दृष्टीस बिघाड होत असल्यामुळे त्याला लवकरात लवकर औषधोपचार मिळायला हवं. 
 
ब्रेन स्ट्रोक झालेल्या रुग्णाचे सुरुवातीचे 6 तास अत्यंत महत्त्वाचे असतात. रक्त पातळ करण्याचा गोळ्या देऊन रक्ताला गाठू नये याची काळजी घेता येऊ शकते. तसेच रक्त दुसऱ्या जागेवर पसरू नये याची काळजी सुद्धा घ्यावयाची असते. 
 
काही काही रुग्णांची तब्येत खूप जास्त खालावते. अश्या वेळेस त्यांच्यावर शल्यचिकित्सा करून रक्त वहिनींमध्ये आलेल्या अडथळे काढण्यात येतात आणि रक्त पुरवठा सुरळीत केला जातो. मिनिमल इन्व्हेसिव्ह न्यूरो इंटरव्हेशन सारख्या तकनीकीमुळे मेंदूच्या नष्ट झालेल्या रक्त वहिनींना सुधार करता येतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती