Mordhan Rice Health Benefits भारतात पुजा- पाठ, सण आणि उपवासात भगरचा वापर केला जातो. बरेच लोक याला मोरधन किंवा वरीचे तांदूळ असेही म्हणतात. भगर शरीरासाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते. भगरीमध्ये असलेले पोषक तत्व शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवून हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
भगर ग्लूटेन फ्री धान्य आहे. जे लोक ग्लूटेनचे सेवन करत नाहीत त्यांनाही भगर खाण्याचा सल्ला दिला जातो. कर्बोदके, जीवनसत्त्वे अ, क, ई आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात मोरधनमध्ये आढळतात. लहान मुले, वृद्ध लोक आणि नियमित आजारी असलेल्या लोकांना देखील भगर खाण्याचा सल्ला दिला जातो. 100 ग्रॅम मोरधन मध्ये प्रथिने 11.6 ग्रॅम, कार्बोहायड्रेट 74.3 ग्रॅम, चरबी 5.8 ग्रॅम, लोह 4.7, कॅल्शियम 14 मिग्रॅ आणि फॉस्फरस 121 मिग्रॅ असतं. रोजच्या आहारात भगर समाविष्ट केल्याने शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते.
इतर कोणत्याही तांदूळ किंवा पिठाच्या तुलनेत मोरधन मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर हे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. घरातील लहान मुले आणि वडिलधार्यांना पोटदुखी, गॅस आणि अन्न पचायला त्रास होत असेल त्यांना भगर खाण्याचा सल्ला दिला जातो.
शरीरात प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी भगरीचे सेवन केलं जातं.
भगरमध्ये आढळणारे पोषक घटक शरीरात इम्यूनिटी वाढवण्यास मदत करतात आणि हाडे मजबूत करतात.