स्थूलपणाचा असाही परिणाम

सोमवार, 22 जून 2020 (17:37 IST)
स्थूलपणा ही एक व्याधी आहे. स्थूलपणा मधुमेह, उच्च रक्तदाबापासून हृदयविकार, कर्करोगासारख्या दुर्धर आजारांना कारणीभूत ठरतो. एवढंच नाही, तर स्थूलपणा तुमच्या चव घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम करू शकतो. कोणताही पदार्थ खाताना त्याची चव महत्त्वाची ठरते. म्हणूनच आपण चवीने खातो. पण स्थूलपणा तुम्हाला चवीने खाऊ देणार नाही. कारण तुम्हाला अन्नपदार्थांची चवच कळणार नाही. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. ' फ्रंटिअर इन इंटिग्रेटिव्ह न्यूरोसायन्स' नामक वैकीय जर्नलमध्ये हा शोध प्रकाशित झाला आहे. चव घेण्याच्या क्षमतेवर होणारा स्थूलत्वाचा परिणाम जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी स्थूल उंदरांचा अभ्यास केला. त्यातून त्यांनी काही निष्कर्ष काढले आणि ही धक्कादायक बाब समोर आली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती