Try this : पोटफुगीवर इलाज

सकाळची सुरुवात प्रसन्नतेने व्हावी, अशी सार्‍यांचीच इच्छा असते. परंतु बर्‍याचदा सकाळीच पोट फुगणे, गॅसेस आदींचा त्रास जाणवू लागतो. खरे तर अशा वेळी काही घरगुती उपचारही करता येण्यासारखे आहेत. परंतु हा त्रास वारंवार होत असेल तर जीवनशैलीत काही बदल करायला हवा. 
 
पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याने अनेक विकार टाळता येतात. त्यामुळे दिवसभरात आवश्यक तेवढे पाणी पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. 
 
अनेकांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते. पण यामुळे पचन क्रियेत अडथळा येतो. त्यामुळे जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर पाणी पिणे अहितकर ठरते.
 
बर्‍याचदा पोट फुगलेल्या व्यक्ती एका जागी बसणे पसंत करतात. त्याऐवजी चालायला हवे किंवा अन्य हालचाली करायला हव्यात. पाण्याचे प्रमाण अधिक असणारी फळे खाणेही आरोग्यासाठी हितकत आहे. या फळांच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त तरल पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते त्यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होत नाही. पोटाला डावीकडून उजवीकडे हलक्या हाताने मसाज करण्यानेही बराच फायदा होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती