पोट कोणत्या अवयवाच्या कामातील बिघाडाने हे समजणे ही निदानाची पहिली पायरी आहे. बहुतेकवेळा पोटातील एखादा अवयव पोटपुखीला जबाबदार असतो. जठर, लहान आतडे, आंत्रपुच्छ (अपेडिक्स), मोठे आतडे, लिव्हर (यकृत), प्लिहा (स्पलिन), स्वादूपिंड (पॅनक्रियास), पित्ताशय (गॉलब्लायडर), मूत्रपिंड (किडनी), मूत्रवाहिन्या (युरेटर), मूत्राशय (युरिनर ब्लॅडर), पुरस्त ग्रंथी (प्रोटेस्ट) असे अनेक अवयव आपल्या पोटात असतात.
या प्रत्येक अवयवाची पोटातीलजागा ठरलेली असते. दुखण्याच्या जागेवरून अवयवयाचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांना येतो. उदा. पोटाच्या उजवीकडे खाली दुखले तर आंत्रपुच्छाचा दाह (अपेंडिसायटिस)ल ची शंका येईल. उजवीकडे वर बरगड्याखाली दुखल्यास जठराचा आणि बेंबीच्या आसपास दुखल्यास लहान आतड्याचा विचार करावा लागतो.
कमरेच्या वरच्या भागात दुखल्यास एका बाजूचे दुखणे असल्यास मूत्रपिंडाचा, पाठीला पट्टासारखे दुखले तर स्वादुपिंडाचा विचार करावा. जेव्हा डॉक्टर नेमके दुखते कोठे हे विचारतात तेव्हा नेमके दुखणे कोठे आहे हे सांगणे महत्वाचे असते.