टॉपर कसं बनाल: टॉपर बनण्यासाठी काही टिप्स अवलंबवा

गुरूवार, 4 मार्च 2021 (18:00 IST)
प्रत्येक विद्यार्थी मन लावून मेहनत करून अभ्यास करतात तरीही यश मिळत नाही. वर्गात टॉप करण्याचे स्वप्न अपुरे राहते. सध्या परीक्षेचा काळ आहे. प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करत असणार. टॉपर बनावं अशी सगळ्यांची इच्छा असते. टॉपर कसं बनावं या साठी काही टिप्स सांगत आहोत, ज्यांना अवलंबवून आपण नक्की टॉपर बनाल.चला तर मग जाणून घेऊ या. 
टॉपर बनण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत.
 
1 आयुष्यात यश मिळवायचे असेल तर नेहमी मन लावून अभ्यास करा. आपल्या पुढे ध्येय ठेवा की मला काही बनायचे आहे. यश मिळवायचे आहे. असं विचार करून लक्ष अभ्यासाकडे केंद्रित करा.
 
2  अभ्यासासाठी जे लक्ष्य ठेवले आहे त्यावर 100 % अनुसरणं करा, यश जरी मिळाले नाही तरी प्रयत्न सुरू ठेवा.
 
3 अभ्यास दरम्यान इतर कुठल्याही गोष्टींचा विचार करू नका. फक्त अभ्यासावर लक्ष्य केंद्रित करा.
 
4 बऱ्याचदा या काळात विद्यार्थ्यांना अभ्यास करावासा वाटत नाही म्हणून आपण त्याच विषयापासून अभ्यासाची सुरुवात करा ज्यामध्ये आपली आवड आहे.
 
5 अभ्यासामध्ये इतरांशी तुलना करू नका कदाचित असं केल्याने आपल्याला वाटू शकते की आपण अभ्यासात कमकुवत आहात आणि आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो.असं होऊ देऊ नका.
 
6 प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ नसतो म्हणून कदाचित आपण एखाद्या  विषयात तज्ज्ञ असाल तर इतर कोणीतरी दुसऱ्या विषयात तज्ज्ञ असेल. म्हणून तुलना करू नका आणि ज्या विषयात कमकुवतपणा जाणवत असेल त्या विषयाचा अधिक अभ्यास करा.
 
7 परीक्षा कोणत्याही एका विषयाद्वारे कधीच पूर्ण होत नाही, म्हणून सर्व विषयांच्या अभ्यासाकडे लक्ष्य द्या.
 
8 आयुष्यात पुढे वाढण्यासाठी यश मिळविण्यासाठी एखाद्या गुरुची आवश्यकता असते म्हणून आपण देखील एखाद्याला आपला गुरु मानून त्याच्या शिकवणीनुसार अभ्यास करा.
 
9 अभ्यासासाठी वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार काम करा, कारण दिवसात 24 तास असतात तर ते 24 तास अभ्यासासाठी कसे वापरायचे आहे. हे वेळापत्रक बनवून मगच अभ्यास करा.
 
10 टाइम टेबल किंवा वेळापत्रक बनवताना प्रत्येक विषयाला महत्त्व द्या. प्रत्येक विषयासाठी दररोज वाचनासाठी वेळ निश्चित केलेली आहे आणि जे विषय कमकुवत वाटत आहे त्यांच्या वर जास्त वेळ द्या.  
 
11 वेळा पत्रकात सर्व गोष्टींची काळजी घ्या कधी झोपायचे आहे, कधी उठायचे आहे.घराचे काम करणे, दैनंदिन काम,आरोग्य इत्यादी सर्व गोष्टीसाठी वेळ निश्चित करा.
 
12 बऱ्याच वेळा विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात ज्यामुळे त्यांची सकाळी झोप होत नाही त्यामुळे सकाळचा वेळ अभ्यास करता येत नाही. रात्री उशिरा पर्यंत अभ्यास करण्या ऐवजी सकाळी लवकर उठून अभ्यास करा.
 
13 पहाटेचे वातावरण शांत असतात आणि मेंदू देखील शांत आणि स्थिर असतो.पहाटे केलेला अभ्यास लवकर लक्षात राहतो. म्हणून सकाळी लवकर उठून अभ्यास करा.
 
14 कोणत्याही विषयाचा अभ्यास समजून करा. घोकमपट्टी करू नका.घोकमपट्टी केल्याने वाचलेले लवकर विसरून जातो. म्हणून विषयांच्या समजण्याकडे लक्ष्य द्या.  
 
15 एखादा विषय पाठांतर करताना त्यामधील ठळक मुद्दे काढून घ्या. जेणे करून तो विषय समजायला सहज होते.लिहून लिहून पाठांतर करा. या मुळे अक्षर आणि लिखाण सुंदर होते.तसेच लेखनाची गती देखील वाढते. म्हणून वाचना ऐवजी लिखाणाकडे लक्ष द्या. जे वाचाल त्याची पुनरावृत्ती करा. आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या. यश नक्कीच मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती