असे म्हणतात की महिलांनी गुरुवारी डोक्यावरून पाणी घेऊ नये, याचे मुख्य कारण आहे बृहस्पती, जो स्त्रीचा पती आणि संतानाचा कारक असतो. या दिवशी महिलांनी डोक्यावरून पाणी घेतले तर गुरू कमजोर स्थितीत येतो आणि तिच्या पती आणि संतानाच्या प्रगतीत अडचण आणतो.
मग महिला असो वा पुरुष, या दोघांनाही गुरुवारी केस कापणे टाळावे आणि पुरुषांनी तर दाढी देखील करू नये, असे केल्याने प्रगती थांबते.
गुरुवारच्या दिवशी घराच्या सफाईशी निगडित कुठलेही काम नाही करायला पाहिजे, जसे जाळे काढणे, घरातील रद्दी विकणे. वास्तू शास्त्रात देखील ईशान्य कोणाचा स्वामी गुरु असतो आणि ईशान्य कोणाचा संबंध मुलांशी असतो आणि या दिवशी घराची सफाई केल्याने मुलांच्या प्रगतीत चुकीचा प्रभाव पडतो.