या महिन्यात राहू ग्रहासह सात ग्रह चाल बदलत आहे, आपल्या राशीसाठी असू शकतं शुभ संकेत

बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (18:11 IST)
सप्टेंबर महिना सुरु झाला असून ज्योतिष्य शास्त्रानुसार या महिन्यात अनेक ग्रह आपली चाल बदलत आहे. एकूण सात ग्रहांच्या स्थितीत परिवर्तन बघायला मिळणार आहे. यापैकी काही ग्रह आपली राशी बदलून दुसर्‍या राशीत प्रवेश करतील तर काही वक्री आणि मार्गी होतील. या महिन्यात सर्वात मोठं राशी परिवर्तन राहू आणि केतूचं असणार.
 
ज्योतिष्य गणनेनुसार सप्टेंबर महिन्यात बुध, गरु, सूर्य, मंगळ, शुक्र आणि राहू-केतू आपली रास बदलणार आहे. जेव्हा ही ग्रह परिवर्तित होतात त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. तर जाणून घ्या या परिवर्तनाबद्दल...
 
कन्या राशीत सूर्याचं राशी परिवर्तन-
16 सप्टेंबरला ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही कुंडलीत सूर्य प्रबळ झाल्यास त्याच्या मान-सन्मानत तसेच नोकरीत प्रगती होते. ज्यांच्या राशीत सूर्य मजबूत स्थितीत असेल त्यांच्यासाठी वेळ शुभ आणि लाभ प्राप्तीचे योग देणारा ठरेल. 
 
मंगळ होणार वक्री-
मंगळ ग्रह स्वतच्या राशीत मेषमध्ये 10 सप्टेंबरपासून वक्री चाल प्रारंभ करणार. वक्री म्हणजे विपरित दिशेला चालणे. विपरित दिशा कधीच शुभ ठरत नाही. मंगळ क्रूर ग्रह मानला जातो अशात व्रकी चालीमुळे काही राशीच्या जातकांसाठी नुकसानदायक ठरु शकतं.
 
बुध ग्रह कन्या राशीत गोचर-
बुध सिंह राशीचा प्रवास संपवून 3 सप्टेंबरला आपल्या स्वयंच्या राशी कन्यामध्ये प्रवेश करणार. हे काही राशींच्या जातकांसाठी शुभ ठरेल.
 
गुरु होणार मार्गी- 
गुरु ग्रह 13 सप्टेंबरला आपल्या राशी धनूमध्ये मार्गी होणार. याने शुभ बदल दिसतील. याचा प्रभाव पृथ्वीवर वास करणार्‍या प्राण्यांवर दिसून येईल.
 
शुक्र राशी परिवर्तन- 
महिन्याच्या पहिल्या दिवशीच शुक्राने आपली राशी परिवर्तित केली. शुक्र ग्रहाने मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला. 
 
राहू परिवर्तन 
ज्योतिशास्त्र क्रूर ग्रह म्हणून ओळखल्या जाणार्‍या राहूचं राशी परिवर्तन झाल्यास सर्व राशींच्या जातकांवर याचा प्रभाव दिसून येतो. 23 सप्टेंबरला राहू वृषभ राशीत प्रवेश करत आहे. याचे शुभ-अशुभ दोन्ही परिणाम दिसून येतील.
 
केतू राशी परिवर्तन
राहूप्रमाणेच केतूला देखील क्रूर ग्रह मानले गेले आहे. ज्योतिष शास्त्राप्रमाणे केतू जातकावर प्रसन्न असल्यास शांती आणि वैभव प्रदान करतं परंतू अशुभ असल्यास व्यक्तीला दारिद्रय देतं. 23 सप्टेंबर रोजी केतू धनू राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे.
 
राशींवर शुभ-अशुभ प्रभाव
 
शुभ- मेष, मिथुन, कर्क, मीन आणि धनू
 
अशुभ- तूळ, वृषभ आणि कन्या
 
इतर राशींवर ग्रह परिवर्तनाचा संमिश्र प्रभाव बघायला मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती