लाल किताब : सावली कशी दान करावी ?

सोमवार, 25 जानेवारी 2021 (17:45 IST)
अनिरुद्ध जोशी 
 
लाल किताबाच्या मते ,शनी हे आपल्या जीवनात चांगले आणि वाईट कर्माची शिक्षा आणि पुरस्कार देणारे आहेत. लाल किताबामध्ये पत्रिकेत शनी ग्रह पहिल्या,चवथ्या, सातव्या किंवा दहाव्या घरात असेल तर अशुभ फळ देतात. शनी ह्यांना जुगार खेळणे, मद्यपान करणे, व्याज घेणे,व्यभिचार करणे, अनैतिक संभोग करणे, खोटेपणा, निरपराध लोकांचा छळ करणे, एखाद्याच्या पाठीमागे त्याचा विरुद्ध काम करणे, वडीलधाऱ्यांच्या अपमान करणे,ईश्वराच्या विरोधात जाणे, दात अस्वच्छ ठेवणे, तळघराची बंद हवा मोकळी करणे, म्हशी किंवा रेड्याला मारणे, साप,कुत्री,आणि कावळ्यांचा छळ करणे.आवडत नाही
 
शनी ग्रहाच्या वाईट प्रभावाला दूर करण्यासाठी नेहमी सावली दान करायला सांगितले जाते. शनीची साढेसाती,शनीचा ढैया किंवा शनीचा कोणता ही त्रास टाळण्यासाठी बऱ्याच उपायांपैकी सावली दान करायला सांगितले जाते. चला तर मग जाणून घेऊ  या की सावली दान करणे म्हणजे काय ?
 
तथापि, लाल किताबामध्ये शनीची साढेसाती आणि शनीच्या ढैयाला विशेष महत्त्वपूर्ण मानले नाही. लाल किताबानुसार केलेल्या वाईट कर्मांची शिक्षा शनी देतात. 
 
सावली दान कशी करावी ? 
सावली दान करण्याचा अर्थ आहे आपली सावली दान करणे. या साठी शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल घेऊन त्यामध्ये नाणं घालून त्या तेलात आपली सावली किंवा प्रतिबिंब बघा आणि हे तेल मागणाऱ्याला देऊन द्या किंवा एखाद्या शनी मंदिरात शनिवारी वाटीत तेल घालून ठेवून या.   
हा  उपाय  किमान 5 शनिवारी करा. असं केल्याने आपल्या वर असलेली शनीची पीडा शांत होईल आणि शनिदेव कृपा करतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती