Rahu Dosh: मुक्तीसाठी सोपे उपाय, दूर होईल वाईट काळ
आपल्या कुंडलीत राहू दोष असल्यास आपल्याला याचे वाईट परिणाम दिसून येतील. परंतू समस्या ही आहे की आपण कसे ओळखाल की राहू दोष आहे. याचे लक्षण म्हणजे मानसिक ताण, आर्थिक नुकसान, स्वत:बद्दल चुकीची समज, लोकांशी वाद, राग, वाणीत कठोरता, अपशब्द बोलणे किंवा हाताचे नखं आपोआप तुटणे, केस गळणे हे राहू दोष असल्याचे लक्षण आहेत. यासोबतच वाहन दुर्घटना, पोटात समस्या, डोकेदुखी, खाद्य पदार्थात केस येणे, अपयश, संबंध खराब होणे, मनावर ताबा नसणे हे देखील कुंडलीत राहूची स्थिती खराब असल्याचे संकेत आहेत.
* आपण देखील यापासून परेशान असाल तर काही उपाय अमलात आणून राहू शांत करू शकता:
* राहू ग्रह शांतीसाठी शुक्रवारी गोमेद पंचधातू किंवा लोखंडी अंगठीत धारण करावे. शनिवारी राहू बीज मंत्राने अंगठी अभिमंत्रित करून उजव्या हाताच्या मध्यमा बोटात अंगठी धारण करावी.