व्हिडिओ गेममुळे मेंदु‍तील विशिष्ट भाग सक्रिय

न्यूयॉर्क- काही गोष्टी विशिष्ट मर्यादेत केल्या तर त्याचा अनेक प्रकाराचा लाभही होऊ शकतो. व्हिडिओ गेम खेळण्याची आवडही अशीच आहे. व्हि‍‍डिओ गेम खेळण्याने मुलांची एकाग्रता वाढते, असे काही शास्त्रज्ञांना आढळले आहे. अमेरिकेतल्या विविध संस्थांमधील शास्त्रज्ञांनी या संबंधात जवळपास 100 सर्वेक्षणे केली आहेत. त्यात त्यांना असे दिसून आले आहे की आपल्या मेंदूतील ज्या भागामध्ये त्रिकोण, चौकोन, पिरॅमिड यातील फरक स्पष्टपणे आकलन होण्याचे कौशल्य समाविष्ट असते तो मेंदूचा भाग व्हिडिओ गेम खेळल्याने अधिक सक्षम होतो.
 
अशाच प्रकारचा एक अभ्यास स्पेनमध्ये करण्यात आला आहे. माणसाची एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीचे अवधान हे फार महत्त्वाचे असते. मात्र, अवधानाचेसुद्धा काही प्रकार असतात. त्या सगळ्या प्रकारांची वाढ व्हिडिओ गेम खेळण्याने होते. शिवाय अशा प्रकाराची कौशल्ये अंतर्भूत असलेल्या मेंदूच्या त्या विशिष्ट भागाचा आकार सुद्धा व्हिडिओ गेम खेळण्याने वाढतो. फ्रंटिअर्स इन ह्यूमन न्यूरो सायन्स या मासिकामध्ये व्हिडिओ गेमच्या बाबतीत करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

वेबदुनिया वर वाचा