नृसिंह जयंती: धन आणि यश प्राप्तीसाठी उपाय

नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला असे मानले जाते. विष्णूंनी हिरण्यकश्यपूवर क्रोध करत हा अवतार घेतला होता, तसेच क्रोधामुळे नृसिंहाचे शरीर जळतं म्हणून त्यांना थंड वस्तू अर्पित केल्या जातात. वेगवेगळे नैवेद्य दाखवल्याने वेगवेगळ्या प्रकाराचे फल मिळतं. नृसिंह जयंतीला काही उपाय केल्याने देखील समस्या दूर होतात.
या दिवशी फुल आणि चंदनाने देवाची पूजा करर्‍याची परंपरा आहे. तसेच नंतर आपल्या इच्छा आणि मनोकामना असेल त्या प्रकारे वस्तू अर्पित केल्या पाहिजे.
 
नृसिंह जयंतीला बचतसाठी देवाला नागकेसर अर्पित केलं जातं. देवाला अर्पित केल्यावर जरा नागकेसर घराच्या तिजोरी किंवा कपाटात पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. 
 
कोर्ट कचेरीच्या प्रकरणात अडकलेले असाल तर नृसिंह चतुर्दशीला देवाला दह्याचे नैवेद्य दाखवावे.
 
अनोळखी शत्रू किंवा प्रतिस्पर्धीमुळे परेशान असाल तर देवाला बर्फाचे पाणी चढवावे. प्रत्येक कार्यात यश मिळू लागेल.
 
कोणी आपल्यापासून नाराज आणि त्यासोबत पुन्हा चांगले संबंध असावे अशी इच्छा असल्यास मक्याची कणीक मंदिरात दान करावी.
 
कर्जामुळे परेशान असाल किंवा पैसा मार्केटमध्ये फसला असल्यास किंवा उधारी परत मिळत नाहीये यामुळे परेशान असाल तर नृसिंह देवाला चांदी किंवा मोती अर्पित करणे योग्य ठरेल.
 
आजारामुळे परेशान असाल, अनेक वर्षांपासून आजार बरा होत नसेल तर नृसिंह देवाला चंदनाचा लेप चढवावा.
नृसिंह जयंतीला उत्तरप्रदेश येथील अनेक भागात एक उपाय करण्यात येतो. याच्या प्रभावामुळे वाईट शक्ती घरापासून दूर राहते असे देखील म्हणतात.
 
जाणून घ्या काय आहे हा उपाय
5 ग्रॅम हिंग, 5 ग्रॅम कापूर आणि 5 ग्रॅम काली मिरपूड, याचे मिश्रण तयार करावे. नंतर त्याचे अगदी लहान म्हणजे मोहरीच्या दाण्याएवढ्या आकाराच्या गोळ्या तयार कराव्या. आता या गोळ्यात दोन सम भागात वाटून घ्याव्या. नृसिंह जयंतीच्या दिवशी एका भाग सकाळी आणि दुसरा भाग संध्याकाळी घरात जाळावा. असे नृसिंह जयंतीपासून तीन दिवस सतत केल्याने कोणती वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या घरावर पडणार नाही. अशात नृसिंह जयंतीपासून सतत 3 दिवस केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती