बॅकलेस ड्रेस घालायचा असेल तर वापरावी अशी ब्रा

सोमवार, 10 मे 2021 (11:09 IST)
आपण अनेक प्रकाराच्या ब्रा बाजारात बघत असाल. वेगवेगळ्या ड्रेसेसच्या प्रकारांसाठी वेगवेगळ्या प्रकाराच्या ब्रा वापरल्या जातात. अशात बॅकलेस ड्रेस घालायचा असेल आणि आर्कषक दिसायचं असेल तर कोणत्या प्रकाराची ब्रा योग्य ठरेल हे ठरवणे कठिण जात असेल तर हा लेख आपल्यासाठी आहे. बॅकलेस ड्रेस किंवा बॅकलेस ब्लाऊज घातलना स्टिक ऑन ब्रा वापरावी लागते. परंतू यासाठी आकार अगदी योग्य असणे गरजेचं असतं. तर आज जाणून घ्या या ब्रा चे प्रकार आणि कशा प्रकार याला कॅरी करावे त्याबद्दल माहिती-
 
स्टिक ऑन ब्रा ही स्ट्रिप्सलेस असते आणि स्तनांच्या बाजूच्या चिकटून राहते. अशात खांद्या आणि पाठीवर कोणत्याही स्ट्रिप्स दिसत नाही. यापैकी अधिक ब्रा या सिलिकॉनने तयार केलेल्या असतात. या व्यतिरिक्त इतर योग्य मेटेरियल देखील वापरलं जातं.
 
संपूर्ण बॅकलेस ड्रेस घालायचा असल्यास सिलिकॉन क्लासिक ब्रा योग्य ठरतात. 
 
बॅकलेस ड्रेस घालायचा असून सपोर्टची गरज भासणार्‍यांसाठी वायर्ड कप्स ब्रा योग्य ठरतात. 
 
क्लिव्हेज दिसण्याची इच्छा असणार्‍यांनी लिफ्टिंग ब्रा वापरावी. यामुळे उभारी मिळते आणि आपल्या ड्रेससह आपल्या फिगरची शोभा वाढते.
 
अधिक कव्हरेजसाठी पुश अप लिफ्ट पुश अप ब्रा किंवा प्लंज ब्रा वापरावी. या ब्रा चा कप एरिया अधिक असल्याने स्तनांना पूर्णपणे आधार मिळतो. 
 
स्तन अधिक मोठे नसल्यास पेस्टीज स्टिक ऑन ब्रा वापरता येऊ शकते ज्यात बॅकलेस ड्रेस सह साईड होल्स असणारे ड्रेस देखील कॅरी करणं सोपं जातं.
 
ब्रा वापरण्याची आणि स्वच्छ करण्याची पद्धत
स्टिक ऑन ब्रा घातल्यानंतर घाम येईल अशा ठिकाणी जाणे टाळा.
ब्रा च्या जवळीक स्कीन स्वच्छ असावी याची काळजी घ्या.
संपूर्ण ब्रा एकत्र चिकटवू नका. यासाठी दोन्ही कप्स वेगवेगळे लावा आणि मग क्लिप लावा. 
स्टिक ऑन ब्रा वॉशिंग मशीनमध्ये धुवु नये.
ब्रा कप्स कोमट पाण्यात जरासं माइल्ड सोप घालून स्वच्छ करा. 
ब्रा व्यवस्थित वाळवणे देखील गरजेचं असतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती