पारंपरिक साड्यांना 'मॉडर्न लूक'

मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (16:34 IST)
fashion
एखादी सुंदर साडी दिसली का महिलांना ती साडी खरेदी करण्याचा मोह होतो. ती साडी एखाद्या समारंभात नेसली का पुन्हा नेसण्याचा महिला विचारदेखील करत नाहीत. नव्या कार्यक्रमाकरता पुन्हा एखादी नवी साडी विकत घेतली जाते. मात्र अशा बर्‍याच नव्या कोर्या साड्या घरात असतात. ज्या नवीन असूनदेखील नेसल जात नाहीत. मात्र या साड्यांपासून न्यू लूकचे फॅशनेबल कपडे शिवले जाऊ शकतात. चला तर जाणून घेऊया साडीपासून तयार केलेले फॅशनेबल ड्रेसेस. 
 
लाँग गाऊन्स 
सध्या गाऊन्सचा जमाना आहे. बर्‍याच मुली महागाईचे गाऊन विकत घेतात. मात्र आपल्या घरी एखादी सुंदर आणि नवी कोरी साडी असल्यास त्या साडीपासून आपण गाऊन तयार करु शकतो. साडीपासून गाऊन तयार करण्यासाठी मस्त अशा बॉर्डर असलेल्या कॉटन साडीची आवश्कता असते. त्या साडीपासून आपण सुंदर असा लाँग गाऊन शिवू शकतो. हा गाऊन एक वेगळा लूक आपल्याला देईल.
 
बॉर्डर गाऊन्स
ज्या साड्यांना मोठा आणि सोनेरी रंगाचा काठ असतो. अशा साड्यांपासून आपण बॉर्डर गाऊन्स शिवू शकतो. साडीचा काठ काढून नेक आणि फ्रंटसाईटला लावल्याने हा एकआगळा वेगळा बॉर्डर गाऊन शिवता येतो. यामुळे लूकदेखील हटके दिसतो.
 
शॉर्ट टॉप
शॉर्ट ड्रेस शिवण्यासाठी शक्यतो सिल्क साड्यांचा वापर करावा. अशा काही सिल्क साड्या असतात. त्यांचा काठ मोठा असतो आणि त्या नेसल्यावर उठावदार दिसतात. अशा साड्यांपासून जिन्स, लेगिन्सवर घालता येतील असे शॉर्ट टॉपदेखील शिवता येतात. यामुळे एक नवीन फॅशनदेखील होते आणि तो टॉप साडीपासून शिवला असल्याचे देखील कळत नाही.
 
वनपिस
सध्या तरुणींचा कल वनपिसकडे वाढला आहे. अनेक तरुणी फॅशनेबल वनपिस मोठ्या प्रमाणात घालतात. मात्र काही तरुणींना आपल्या आवडीनुसार रंग मिळत नाही. परंतु त्या रंगाची साडी असल्यास त्यापासून आपण वनपिस शिवू शकतो. या वनपिसुळे तुम्ही हटके देखील दिसू शकतात.
 
जॅकेट्‌स
सध्या जॅकेट्‌सची चलती आहे. शॉर्ट टॉप असो किंवा एखादे टी-शर्ट असो त्यावर जॅकेट्‌स घातले की एक नवीन लूक दिसतो. हे जॅकेट तुम्ही साडीपासूनदेखील शिवू शकता. वेगवेगळ्या प्लेन किंवा बुट्टे असलेल्या ड्यांपासून सुंदर असे जॅकेट तयार होऊ शकते. हे जॅकेट्‌स विविध स्टाईलनेदेखील शिवून फॅशन करु शकता.
 
कफ्तान
साड्यांपासून कफ्तान देखील शिवू शकतो. कफ्तानचे अनेक प्रकार आहेत. कफ्तानमध्ये टॉप, शॉर्ट ड्रेस आणि वनपिस हेदेखील प्रकार येतात. कफ्तान टॉप लेगिंन्स आणि जिन्सवर देखील घालता येतो. या ड्रेसिंगमध्ये एक आगळा वेगळा स्मार्ट लूक दिसतो. 
 
ब्लॅक ब्यूटी
काळा हा रंग सगळंना आवडतो. त्यामुळे बर्‍याचदा काळ्या रंगाच्या सोनेरी बुट्टे असलेल्या साड्या खरेदी केल्या जातात. मात्र या साड्या काही महिला शुभ समारंभात घालत नाहीत. त्यामुळे त्या तशाच पडून राहतात. परंतु या काळ्या रंगाच्या साड्यांपासून अफलातून अशी ब्लॅक ब्यूटी करु शकतो. काळ्या रंगांच्या साड्यांपासून कुर्ती, टॉप आणि वनपिस शिवता येऊ शकतात. या काळ्या रंगामुळे व्यक्ती डिसेंट देखील दिसते.
 
अशा या हटके आयडिया वापरुन तुम्ही भन्नाट स्टालीश राहू शकता. चला तर मग फॅशनेबल राहायचे असल्यास नक्कीच या आयडियांचा वापर करुन पाहा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती