International Nurses Day : फ्लॉरेन्स नाईटिंगेल

बुधवार, 12 मे 2021 (12:40 IST)
अढळ श्रद्धा, कमालीची सेवाभावी वृत्ती, कार्यावरील निष्ठा या बळावर रुग्णांची शुश्रुषा करून या सेवेला प्रतिष्ठा मिळवून दिलेल्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 रोजी इटलीतील फ्लॉरेन्स येथे झाला. त्या लेखिका व  संख्याशास्त्रज्ञ होत्या. 1853 साली झालेल्या क्राइमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना लेडी विथ द लॅम्प असे म्हणत. सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्र्वराने आपल्याला भूतदेसाठी व मनवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. 
 
सार्वजनिक आरोग्य व रुग्णालयाच्या विषयात विशेषज्ञ तज्ज्ञ म्हणून गणल्या जाणार्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी आधुनिक रुग्णपरिचर्याशास्त्राचा पाया घातला. खडतर परिस्थितीतून आणि विरोधातून सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करून नाईटिंगेल यांनी आपल्या कामातून जगापुढे आदर्श निर्माण केला. विरोधावर प्रयत्नांची आणि श्रद्धेची मात करून परिचारिकापदाला प्रतिष्ठा मिळवून देणार्या नाईटिंगेल यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस जागतिक परिचारिका दिन मानण्यात येतो. अशा या सेवाभावी परिचारिकेचे 13 ऑगस्ट 1910 रोजी निधन झाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती