मादाम भिकाजी कामा

गुरूवार, 24 सप्टेंबर 2015 (15:57 IST)
भारतीय क्रांतिकारक महिला आणि परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ मादाम भिकाजी रुस्तुम कामा यांचा आज जन्मदिन. 24 सप्टेंबर 1861 रोजी मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. 1902 मध्ये इंग्लंडमध्ये त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. दादाभाई नौरोजींना ब्रिटिश संसदेत महत्त्वपूर्ण सहकार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इंग्लंडमधील वास्तव्याच्या, सावरकरांच्या अलौकिक वक्तृत्वाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. आणि त्या ‘अभिनव भारता’च्या सदसस्या झाल्या.  
 
क्रांतिविषयक वाङ्मय प्रसिद्ध करणे, भारताविषयी जोशपूर्ण व्याख्याने देणे आणि क्रांतिकारकांना सर्वतोपरी सहाय करणे हेच जीवनकार्य मानू त्यांनी आपला परदेशातील कालखंड व्यतीत केला. 1907 च्या ऑगस्टमध्ये जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत सरदारसिंग राणांच्या बरोबर त्यांनी भारतीय स्वतंत्र्याचा ठराव मांडला आणि ‘वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगा फडकाविला. अशी ही भारतीय स्वातंत्र्याची क्रांतिज्वाला 11 ऑगस्ट 1936 रोजी निमाली.

वेबदुनिया वर वाचा