विराट कोहलीचा महिलांसाठी सुंदर मॅसेज

गुरूवार, 8 मार्च 2018 (15:30 IST)
आंतरराष्‍ट्रीय महिला दिनाचं औचित्‍य साधून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने महिलांसाठी सुंदर मॅसेज दिला आहे. विशेष म्‍हणजे त्‍याने अनु्‍ष्‍का शर्माला हा मॅसेज डेडिकेट केला आहे. 
 

विराटने अनुष्‍काला हा व्‍हिडिओ टॅग करत ट्‍विटरवर लिहिले आहे, 'अपने जीवन की एक असाधारण प्रतिभा की धनी महिला को इस पोस्‍ट में टैग कीजिए, जो बराबर नहीं बेहतर हैं.'
 

विराटने व्‍हिडिओमध्‍ये म्‍हटले आहे, 'महिला आणि पुरुष समान नाही. खरंतरं, पुरुष होणे महिला होण्‍यापेक्षा सहज आहे. यौन शोषण, भेदभाव, लिंगवाद, घरगुती हिंसाचार आणि अशा प्रकारचे अत्‍याचार...या सर्व गोष्‍टी नंतरदेखील महिला आयुष्‍याच्‍या प्रत्‍येक वाटेवर पुढे जात जातात. खडतर जीवनावर प्रवास करतात. तुम्‍ही आताही असाच विचार करताय की महिला-पुरुष समान आहेत? नाही. ते समान नाहीत तर त्‍या खूपच साहसी, कर्तृत्‍ववान आणि पुरुषांपेक्षा सरस आहेत. जगातील प्रत्‍येक महिलेला माझ्‍याकडून महिला दिनाच्‍या खास शुभेच्‍छा.' 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती