ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंगची पर्थ कसोटीत कॉमेंट्री सुरू असताना त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पॉन्टिंग समालोचन पॅनेलचा एक भाग होते, जिथे त्यांनी अचानक तब्येत बिघडल्याची तक्रार केली. त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.
शुक्रवारी पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी समालोचन करताना पाँटिंगने प्रकृती अस्वास्थ्याची तक्रार केली. चॅनल सेव्हन नेटवर्कच्या समालोचनाची ड्यूटी ते करत होते. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. समालोचन करताना ते आजारी पडले.