त्या कठिण काळात सचिन तेंडुलकर विराटच्या पाठीशी उभा राहिला होता. सोमवारी भारताच्या मालिका विजयानंतर विराटने सचिनकडून मिळालेल्या त्या मौलिक सल्ल्याबद्दल सांगितले. इंग्लंडच्या निराशाजनक दौर्यानंतर मी सचिनबरोबर बोललो. सचिनने त्यावेळी मला माझ्याबद्दल बोलल्या जाणार्या, लिहिल्या जाणार्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. मी विनोदाने किंवा उपरोधाने हे बोलत नाहीये. तो मला मिळालेला सर्वोत्तम सल्ला होता असे एक्सप्रेस ट्रिब्युनने कोहलीच्या हवाल्याने म्हटले आहे.
सचिनने मला मैदानावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. माझ्याबद्दल काय लिहिले जातेय, बोलले जातेय त्याकडे मी पाहत नाही. संघासाठी काय उपयुक्त ठरेल, काय केले पाहिजे त्याचा मी विचार करतो. याचा मला मैदानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भरपूर फायदा होतो असे कोहलीने सांगितले.