पुणे- कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची पुणे कसोटी तब्बल 333 धावांनी गमावली. कंगारूंनी कोहली ब्रिगेडला अवघ्या तीनच दिवसात गुंडाळले. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमच्या खेळपट्टीवर अवघ्या तीन दिवसात 40 विकेट्स पडल्या.