प्रथम फलंदाजी करताना गॅरेथ डेलेनीच्या 31 धावा आणि जोशुआ लिटलच्या नाबाद 22 धावांच्या जोरावर आयर्लंडने 20 षटकांत 9 गडी गमावून 106 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही, मात्र बाबरने जबाबदारीने खेळताना 34 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने नाबाद 32 धावा केल्या, त्या जोरावर पाकिस्तानने सात चेंडू शिल्लक असताना सात गडी गमावून 111 धावा करून विजय मिळवला.