मोहम्मद कैफची क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती

शनिवार, 14 जुलै 2018 (10:42 IST)
क्रिकेटपटू मोहम्मद कैफने क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहिती कैफने इमेलवरुन दिली. दरम्यान, कैफने निवृत्तची जाहीर केली तरी तो क्रिकेट समालोचक म्हणून काम करीत आहे.
 
मोहम्मद कैफने १२ वर्षांपूर्वी भारतीय संघासाठी अखेरचा सामना खेळला होता. कैफने टीम इंडियाकडून १३ कसोटी, १२५ वनडे सामने खेळले आहेत. २००२ मध्ये झालेल्या नेटवेस्ट सीरिजच्या अंतिम सामन्यामध्ये कैफने लॉर्ड्सच्या मैदानावर ८७ धावांची खेळी करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. हा सामना १३ जुलै रोजी खेळला होता तर त्याच म्हणजे  १३ जुलै रोजीच मोहम्मद कैफने निवृत्तीची घोषणा केलेय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती