India vs Sri Lanka T20 Series: T20 मालिकेपूर्वी मोठा बदल, या खेळाडूचा संघात समावेश

शुक्रवार, 26 जुलै 2024 (17:53 IST)
टीम इंडिया सध्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला सामना 27 जुलैपासून म्हणजेच शनिवारपासून सुरू होणार आहे. संघ त्याच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, संघाचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमेरा जखमी झाल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. त्यांना ब्राँकायटिस आणि श्वसनाच्या संसर्गाने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
भारत आणि श्रीलंका यांच्यातील T20 मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी होणार आहे. भारतानंतर या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघही जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही संघ सध्या या मालिकेच्या तयारीत व्यस्त आहेत. तीनपैकी पहिले दोन सामने अवघ्या दोन दिवसांत खेळवले जातील. म्हणजे 27 आणि 28 जुलैला सलग सामने आहेत.
 
संघाचा स्टार वेगवान गोलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर पडल्याने श्रीलंका क्रिकेट संघासंघाचा स्टार वेगवान गोलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर पडल्याने श्रीलंका क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून संघाचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमेरा जखमी झाल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या साठी काही बदल केले आहे.  दुष्मंथा चमीराला वगळल्यानंतर त्याच्या जागी असिथा फर्नांडोचा संघात समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मोठी गोष्ट म्हणजे भारताविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेसाठी दुष्मंथा चमेरा हा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे, 
 
T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे, मात्र श्रीलंकेने केवळ टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.वन डे मालिकेतील पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी होणार आहे.
Edited by - Priya Dixit  
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती