भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला रविवारी (17 डिसेंबर) सुरुवात झाली. जोहान्सबर्गच्या न्यू वँडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा संघ 116 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 16.4 षटकात 117 धावा करत सामना जिंकला. या मालिकेतही भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. भारताचा या वर्षातील वनडेतील हा २६ वा विजय आहे. 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाने 26 सामने जिंकले होते. कांगारू संघाने 2023 मध्ये 30 सामने जिंकले आहेत. आफ्रिकन संघाचा पराभव करत भारताने मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 19 डिसेंबरला गकबेराह येथे होणार आहे.
जोहान्सबर्गच्या न्यू वँडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा संघ 116 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 16.4 षटकात 117 धावा करत सामना जिंकला. भारताकडून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनने नाबाद 55 धावा केल्या. त्याने 43 चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार मारले. श्रेयस अय्यरने 45 चेंडूत 52 धावा केल्या. त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारला. रुतुराज गायकवाड पाच धावा करून बाद झाला. टिळक वर्मा एक धाव घेत नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून वियान मुल्डर आणि अँडिले फेहलुकवायो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
अर्शदीपच्या कहरानंतर आवेश खानची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली.
साई सुदर्शनने पदार्पणाच्याच सामन्यात अर्धशतक पूर्ण केले. त्याने 16व्या षटकात 50 धावांचा टप्पा ओलांडला. त्याच्यापाठोपाठ श्रेयस अय्यरनेही षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले.