South Africa vs India 4th T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 मालिकेतील शेवटचा आणि चौथा सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अगदी योग्य ठरला. या सामन्यात टीम इंडियाने विक्रमांची मालिका केली. संजू सॅमसन आणि टिळक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना तंबी दिली. या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी शानदार शतके झळकावली. त्यामुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 283 धावा केल्या.
या सामन्यात अनेक विक्रम केले
चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजांकडून धमाका पाहायला मिळाला. संजू सॅमसन आणि टिळक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येक गोलंदाजाला झोडपून काढले. परदेशी भूमीवर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाची ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.
संजू सॅमसन आज वेगळा दिसत होता. संजू येताच त्याने चौकार आणि षटकार मारले. याआधी दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात संजू खातेही न उघडता बाद झाला. त्यानंतर आता चौथ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून पुन्हा शानदार शतक झळकले आहे. या मालिकेतील संजूचे हे दुसरे शतक आहे. संजूने पहिल्या सामन्यातही शतक झळकावले होते. आता एका वर्षात तीन टी-20 आंतरराष्ट्रीय शतके करणारा संजू जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
चौथ्या T20 मध्ये भारतीय फलंदाजांकडून षटकारांचा पाऊस पडला. या सामन्यात टीम इंडियाने एकूण 23 षटकार ठोकले. आता टी-20 इंटरनॅशनलमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर झाला आहे. या सामन्यात भारताकडून टिळक वर्माने 10 षटकार, संजू सॅमसनने 9 आणि अभिषेक शर्माने 4 षटकार ठोकले.