वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे, ज्यातील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात शेरफेन रदरफोर्डने वेस्ट इंडिजसाठी दमदार फलंदाजीचे उदाहरण दाखवले. त्याने एकहाती शतक झळकावून संघाला विजयापर्यंत नेले आणि विक्रम केला.बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर 295 धावांचे लक्ष्य देण्यात आले, त्याला प्रत्युत्तरात साई होप आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्या दमदार खेळीमुळे वेस्ट इंडिजने लक्ष्याचा पाठलाग केला.
वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा सलामीवीर ब्रेंडन किंग (9 धावा) आणि एविन लुईस (16 धावा) काही खास दाखवू शकले नाहीत. केसी कार्टीलाही केवळ 21 धावा करता आल्या. यानंतर कर्णधार साई होप आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी धावा काढण्याची जबाबदारी घेतली. रदरफोर्डने केवळ 80 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 113 धावा केल्या. त्याने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. तर कर्णधार साईने 88 चेंडूत 86 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच संघाने सामना जिंकला. शेरफेन रदरफोर्डने 2023 साली वेस्ट इंडिजकडून पदार्पण केले.रदरफोर्डने आतापर्यंत 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 443 धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.