आयपीएल 2025 सीझनची तयारी सुरू झाली असून येत्या काही दिवसांत खेळाडूंना कायम ठेवण्याचा आणि सोडण्याचा निर्णय फ्रँचायझी घेतील. दरम्यान, सर्वांच्या नजरा चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आहेत. आता सीएसकेच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कारण खुद्द माहीने आयपीएलच्या पुढील हंगामात खेळण्याचे संकेत दिले आहेत.
आता धोनीने स्वतः IPL 2025 मध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. एक खेळाडू म्हणून गेल्या काही वर्षांत जे काही क्रिकेट खेळत आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे, असे त्याने म्हटले आहे. धोनी म्हणाला, माझ्या गेल्या काही वर्षांत जे काही क्रिकेट खेळू शकलो, त्याचा आनंद घ्यायचा आहे