आता थेट खेळाडूंच्या बॅटमध्ये मायक्रो चिप

क्रिकेटमध्ये आता थेट खेळाडूंच्या बॅटमध्ये मायक्रो चिप बसवण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपासून मायक्रो चिप बसवण्यात येईल. यामुळे फलंदाजाने एखाद्या बाऊन्सरवर किती क्षणात फटका खेळला किंवा एखादा फलंदाजाने फटका खेळल्यानंतर, चौकार जाण्यासाठी किती सेकंद लागले, याबाबतची सर्व उत्तरं मिळणार आहेत. आयसीसीने याबाबत निर्णय घेतला असून, प्रत्येक संघातील 3 खेळाडूंच्या बॅटमध्ये ही मायक्रो चिप बसवण्यात येईल. हे तीन खेळाडू कोण असतील आणि त्यांची निवड कशी होईल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र यामध्ये आघाडीचे तीन फलंदाज असू शकतात.
 

वेबदुनिया वर वाचा