Asia Cup: श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे विश्वचषकापूर्वी भारताची चिंता वाढली

शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (16:00 IST)
आशिया चषकानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. कांगारू संघ 23, 24 आणि 27 सप्टेंबर रोजी भारतीय भूमीवर तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांची ही शेवटची वनडे मालिका असेल. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्यावर भर देणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) निवडकर्ते लवकरच या मालिकेसाठी संघाची निवड करतील.
 
श्रेयस अय्यरची दुखापत वाढली आहे. प्रदीर्घ अनुपस्थितीनंतर त्याची आशिया चषकासाठी निवड झाली. त्याची विश्वचषक संघातही निवड झाली आहे. आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो अनफिट झाला होता. त्याच्या पाठीत समस्या आहे. मात्र, अय्यरची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे मानले जात आहे. असे असूनही तो बांगलादेशविरुद्ध सुपर-4मध्ये खेळणार हे निश्चित नाही
 
स्ट्रेस फ्रॅक्चर दुरुस्त करण्यासाठी अय्यर यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर तो बराच काळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत राहिला. दुखापतीतून सावरल्यानंतर तो संघात परतला. आशिया चषकाच्या गट फेरीत तो पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध खेळला होता, पण सुपर-4 मधील बाबर आझमच्या संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने पाठीत दुखण्याची तक्रार केली होती. अय्यर गुरुवारी (14सप्टेंबर) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी वैकल्पिक प्रशिक्षण सत्रादरम्यान दिसला. त्याने फलंदाजीचा सरावही घेतला, पण त्याच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींनी संघाला त्रास दिला आहे. आता तो बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध होतो की नाही हे पाहायचे आहे.

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती या आठवड्यात कधीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर करू शकते, असे मानले जात आहे. हे बांगलादेशविरुद्धच्या सामन्याच्या दिवशी किंवा रविवारी आशिया चषक फायनलपूर्वी घडू शकते.
 
विश्वचषकासाठी प्राथमिक संघ जाहीर करण्यात आला आहे. 27 सप्टेंबर ही अंतिम यादी आयसीसीला सादर करण्याची तारीख आहे. भारतीय संघ व्यवस्थापन अय्यरच्या तंदुरुस्तीबद्दल चिंतेत असेल आणि जर तो ऑस्ट्रेलिया मालिकेत खेळला नाही तर दुखापतीनंतर तो विश्वचषकात खूपच कमी सामने खेळेल. भारतीय संघाला 8 ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. त्याआधी टीम इंडिया दोन सराव सामने खेळणार आहे.



Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती