भारतीय संघाचा मुख्य फिरकीपटू रविचंद्रन अश्विन 2016 मधील उल्लेखनीय कामगिरीनंतर यंदाच्या वर्षात देखील दमदार कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. यादरम्यान, अश्विन जाहिरात विश्वात देखील धोनी आणि विराटलाही यंदा मागे टाकण्याची शक्यता आहे. अश्विन लवकरच एका कंपनीसोबत करार करणार असून या करारानंतर तो सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त करेल.