तिस-या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ गडी राखून विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. शिखर धवन (११९), युवराज सिंग (५५) यांच्या शानदार खेळीमुळे भारताच्या विजयाला हातभार लागला. रोहित शर्मा (४), धवन (११९), कोहली (१९), युवराज सिंग (५५), रैना (३४), ढोणी (२३) आणि जडेजा (२) अशी भारतीय खेळाडूंची धावसंख्या होती. वेस्ट इंडिजतर्फे रामपाल व ब्राव्हो यांनी २ तर नरिन याने १ बळी टिपला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणा-या वेस्ट इंडिजने ५० षटकांत २६३ धावा केल्या. चार्ल्स (११),पॉवेल (७०, सॅम्युअल्स (७१), डी.एम. ब्राव्हो (नाबाद ५१), सायमन्स (१३), डीजे ब्राव्हो (४) व सॅमी (नाबाद ३७) अशी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची धावसंख्या होती. भारतातर्फे अश्विनने २ तर शमी, कुमार व जडेजाने प्रत्येकी १ बळी टिपला.